११ ऑक्टोबर ला बंकापुर मोहिमेस निघालेले छत्रपती शिवराय सातारा येथे मुक्कामी.
१४ आॅक्टोबर इ.स.१८४७
महाराष्ट्रातील एक सद्गुणी, प्रजाहितदक्ष पण दुर्दैवी राजे प्रतापसिंह भोसले यांचे निधन. छत्रपती शाहू (दुसरे) यांचे ते थोरले चिरंजीव होते. पेशवाईच्या अस्तानंतर माऊंट स्टुअर्ट एल्फिस्टन यांनी पुन: त्यांना छत्रपतींच्या गादीवर बसवले. पाठशाळा आणि संस्कॄत व मराठीबरोबरच इंग्रजी भाषेच्या अध्यापनाला त्यांनी उत्तेजन दिले.* *(जन्म: १८ जानेवारी १७९३)*