कृषी ड्रोन अनुदान योजना 2024 : संपूर्ण अर्ज प्रक्रिया online कृषी पदवीधारक व शेतकऱ्यांसाठी

शेतकरी बांधवांना नम्र अभिवादन! आपल्यासाठी एक महत्त्वपूर्ण माहिती घेऊन आलो आहोत. आपल्या कृषी व्यवसायातील गरजांसाठी केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने चालू केलेल्या ‘ड्रोन अनुदान योजने’ विषयी आज आपण जाणून घेणार आहोत. ही योजना शेतकरी उत्पादक संस्था (FPOs) आणि कृषी पदवीधरांसाठी (bsc agriculture) असून, तिचा मुख्य उद्देश ड्रोनच्या सहाय्याने आधुनिक शेतीला चालना देणे हा आहे. (Krushi drone anudan yojana 2024 online form application 2024 full process)

ड्रोन अनुदान योजनेचा आरंभ व उद्देश : Aim of krushi drone yojana 2024 Maharashtra


सरकारने २०२२-२३ आर्थिक वर्षात ड्रोन अनुदान योजना सुरू केली, ज्याची अंमलबजावणी अजूनही सुरू आहे. या योजनेत राज्यस्तरावर देखील काम सुरू असून २०२५ पर्यंत अनेक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळण्याची शक्यता आहे, कारण ऑफलाईन अर्ज प्रक्रिया मुळे काही लोकांना याचा लाभ मिळाला परंतु , योजना सर्व शेतकरी बांधवांन पर्यंत पोहचवण्यासाठी व कृषी पदवी धारकांसाठी रोजगार उपलब्ध करून देण्य साठी सरकारने आता ऑनलाईन पदधतीने अर्ज प्रक्रिया सुरू करन्यात आहे.

शेतकऱ्यांन साठी ड्रोन खरेदीसाठी अनुदान का देण्यात येत आहे : Krushi drone yojana 2024 maharshtra


या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ड्रोन खरेदीसाठी अनुदान दिले जाते, ज्यामुळे कीटकनाशके, खते आणि अन्य कृषी साहित्यांच्या वितरणासाठी ड्रोनचा वापर करून शेतकरी आपली उत्पादकता वाढवू शकतात.

Organic Farming :सेंद्रिय शेती म्हणजे काय? सेंद्रिय शेती का केली पाहिजे ?

ड्रोन योजनेसाठी ऑनलाइन अर्ज कसा करावा : Online form for krushi drone yojana 2024 Maharashtra


या योजनेसाठी शेतकरी बांधवांना ऑनलाइन अर्ज करणे अनिवार्य आहे. अर्ज भरण्यासाठी Mahadbt farmer शेतकरी योजना पोर्टल वर लॉगिन करून प्रक्रिया सुरू करता येईल. येथे अर्जासाठी यूजर आयडी, पासवर्ड, आणि आधार क्रमांक वापरून लॉगिन करावे लागेल. लॉगिन केल्यानंतर मुख्य स्क्रीनवर तुम्हाला ‘अर्ज करा’ या पर्यायावर क्लिक करावे लागेल.

अर्ज भरण्यासाठी या लिंक वर क्लिक करा : Farmer’s Mahadbt

अर्ज करण्या साठी महत्वाचे टप्पे: Important step to apply for Drone yojana

१)ऑप्शन निवड: ड्रोन खरेदीसाठी अर्ज करताना ‘कृषी यांत्रिकीकरण’ पर्यायावर क्लिक करा.

२)कृषी उपकरण खरेदीचे पर्याय: अर्जाच्या फॉर्ममध्ये ड्रोन खरेदीचा पर्याय निवडा.

३)CSC आणि FPO निवड: अर्ज भरताना, ज्या शेतकऱ्यांनी कृषी पदवी घेतली आहे किंवा जे FPO सदस्य आहेत त्यांच्यासाठी विशेष पर्याय आहेत.

अर्ज केल्यानंतरची प्रक्रिया: Process after filling of drone yojana application

अर्ज सादर केल्यानंतर, योजनेसाठी शेतकऱ्यांची निवड ही

१)लॉटरी पद्धतीने केली जाईल.
२)निवड झालेल्या लाभार्थ्यांना पुढील कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक असेल.

निवड प्रक्रियेबाबत आपल्याला वेळोवेळी अपडेट्स दिले जातील.

अर्ज भरण्यासाठी या लिंक वर क्लिक करा : Farmer’s Mahadbt

महत्त्वाची सूचना आणि माहिती: Important information regarding yojana


1)सवलत फक्त ऑनलाइन उपलब्ध आहे: या योजनेसाठी फक्त ऑनलाइन अर्ज स्वीकारले जातात. कोणत्याही प्रकारच्या ऑफलाइन अर्जाची परवानगी नाही.

2)GR माहिती: योजनेच्या अधिकृत माहितीपत्रकासाठी (GR), संबंधित लिंक आपल्याला वर्णन बॉक्समध्ये मिळेल.

3)लॉटरीसाठी पात्रता: अर्जाचे योग्य सादरीकरण केल्यानंतरच तुम्हाला लॉटरी पद्धतीतून निवडले जाईल.

फसवणूक: पीएम किसानची फाइल डाउनलोड करताच २.४८ कोटींचा चुना! अन्य तिघांचीही १२ लाखांनी फसवणूक

योजनेची उद्दिष्टे व लाभ: drone anudan yojana maharashtra


या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ मिळवून शेतीच्या कार्यक्षमतेत सुधारणा करण्याचा उद्देश आहे. ड्रोनच्या सहाय्याने उत्पादन प्रक्रियेत सुधारणा होईल, आणि यामुळे कीटकनाशक आणि खतांचा वापर कमी होण्यास मदत मिळेल. यामुळे शेतकऱ्यांचा खर्च कमी होऊन उत्पादन वाढ होईल.

शेतकऱ्यांनो, या योजनेच्या मदतीने तुम्हाला तुमच्या शेतात नव्या तंत्रज्ञानाचा वापर करता येईल. अर्ज प्रक्रियेत मार्गदर्शनाची आवश्यकता असल्यास किंवा कोणतेही प्रश्न असल्यास, शेतकरी आपल्या तालुक्याच्या कृषी केंद्रावर संपर्क साधू शकतात.

शुभेच्छा,
शेतकऱ्यांना आधुनिक यंत्रणांनी प्रगती करण्याचा संकल्प – ड्रोन अनुदान योजना!

SHIV DINVISHESH 21 OCTOBER

राशीभविष्य 21 October 2024: आजच्या राशी भविष्याचे मार्गदर्शन

Leave a Comment