MAHADBT: महाडीबीटी शेतकरी योजना ठिबक तुषार सिंचन लॉटरी यादी जाहीर

By Rushi Bhosle

Published on:

सर्वांना नमस्कार, शेतकरी मित्रांनो महाडीबीटी या योजनेमार्फत बऱ्याच नवनवीन योजनांचा शेतकऱ्यांना लाभ मिळत असतो. यामध्ये शेतकऱ्यांना लॉटरी पद्धतीत शेतकऱ्यांची निवड करतात आणि यात शेतकऱ्यांकरिता नवनवीन उपकरणे खरेदी करण्याकरिता सबसिडी ही दिली जाते.

शेतकऱ्यांना शेती करत असताना अनेक अडचणी समस्यांना सामोरे जावे लागते त्यातून बाहेर येण्यासाठी आपले शासन महाडीबीटी अंतर्गत अनेक योजना स्कीम शेतकऱ्यांसाठी राबवत असते त्यापैकीच शासनाची ठिबक व तुषार सिंचन अनुदान योजना ही सुरू झालेली आहे त्यामुळे अधिकाधिक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेऊन आपण शेती करत असताना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीचे उत्पन्न वाढवावे यासाठी या सर्व योजना शेतकऱ्यांच्या लाभासाठी आहेत.

महाडीबीटी अंतर्गत ठिबक व तुषार सिंचन अनुदान योजना यामध्ये अर्ज केलेल्या शेतकऱ्यांची नोव्हेंबर महिन्याची यादी लॉटरी पद्धतीनं संबंधित विभागाकडून जाहीर करण्यात आलेली आहे ती यादी तुम्ही खाली दिलेल्या प्रमाणे ती जिल्हा निहाय यादी पाहू शकता. महाराष्ट्रातील अनेक शेतकरी आपल्याला एसएमएस किंवा येतो याची वाट पाहत होते त्यामुळे शेतकऱ्यांची ही वाट पाहण्याची ही प्रतीक्षा या ठिकाणी शासनाने संपवलेले आहे त्यामुळे कृषी विभागाकडून या ठिकाणी शेतकऱ्यांना एसेमेस पाठवण्यात आलेले आहे.

तरी शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर पोर्टल वर जाऊन त्या ठिकाणी लॉगिन करून या मध्ये आपले नाव आले की नाही त्याची तपासणी करावी जर या ठिकाणी आपले नाव आले असल्यास आपल्याकडील जी काही कागदपत्रे आहेत शासनाने आपल्याला महाडीबीटी अंतर्गत जी कागदपत्रे अपलोड करण्यास सांगितले आहे ती कागदपत्रे लवकरात लवकर अपलोड करून या योजनेचा अवश्य लाभ घ्यावा.

महाडीबीटी वेबसाईटवर शेतकऱ्यांची लॉटरी पद्धतीने निवड पूर्ण झाल्यानंतर लाभार्थी शेतकऱ्यांना त्यांच्या नोंदणी मोबाईलवर लॉटरी लागल्याचा एसएमएस पाठवण्यात येतो त्यानंतर शेतकऱ्यांना संबंधित प्रकल्पासाठी कागदपत्र व इतर आवश्यक कागदपत्रे पोर्टलवर अपलोड करावी लागतात त्या संदर्भातील शेतकऱ्यांना सूचना या एसएमएसच्या माध्यमातून त्यांच्या मोबाईलवर पाठवण्यात येतात ठिबक व तुषार सिंचनाची यादी एक नोव्हेंबर 2023 रोजी लॉटरी पद्धतीने प्रसिद्ध करण्यात आलेली असून निवड झालेल्या शेतकऱ्यांना महाडीबीटी फॉर्मल पोर्टलवर लॉगिन करून शेतकऱ्यांना आवश्यक ती कागदपत्रे त्या ठिकाणी अपलोड करावे लागतात.

जर कुणी शेतकरी महाडीबीटी फोटो लागू केला असेल तरी आपल्या शेजारी किंवा परिसरात कोणी असेल तर संबंधित त्या शेतकऱ्यांना आपण या लॉटरी जाहीर झालेली सांगावी व त्यांना लाभ घेण्यास या ठिकाणी सांगावे.

कृषी विभाग महाराष्ट्र शासनाच्या एक नोव्हेंबर 2023 रोजी कृषी यांत्रिकीकरण तसेच सिंचन सुविधासाठी लॉटरी काढलेली असून या मध्ये निवड झालेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या नोंदणी करत मोबाईलवर या संदर्भातील अपडेट पाठवण्यात आलेले आहे ज्या शेतकऱ्यांना मेसेज प्राप्त झाला असेल अशा सर्व शेतकऱ्यांनी आपली आपले डॉक्युमेंट लवकरात लवकर महाडीबीटी पोर्टलवर अपलोड करावी आणि ज्या शेतकऱ्यांना हा मेसेज प्राप्त झाला नसेल त्यांनी महाडीबीटी पोर्टल वरील यादीमध्ये आपलं नाव तपासून पहावं

महाडीबीटी पोर्टल साठी आवश्यक ती कागदपत्रे कोणती आहेत ?

  • शेतकऱ्यांना स्वतःचा सातबारा व आठ अ उतारा ( डिजिटल स्वाक्षरीतील किंवा तलाठी स्वाक्षरीतील)
  • सामायिक क्षेत्र असल्यास खातेदारांचे संमती पत्र
  • सातबारा उताऱ्यावर सिंचन स्त्रोत नोंद नसल्यास स्वयंघोषणापत्र
  • अर्जदार अज्ञान किंवा अठरा वर्षाखालील असेल तर अ. पा .क स्वयंघोषणापत्र
  • अर्जदाराचे जात वैधता प्रमाणपत्र
  • शेतकऱ्यांचे आधार कार्ड
  • शेतकऱ्यांचे बँक पासबुकची झेरॉक्स

एकूणच मित्रांनो महाडीबीटी या वेबसाईटवर ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन जास्ती ज्या ज्या शेतकऱ्यांची लॉटरी लागली आहे त्यांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे याच्याविषयी होती ‌ महाडीबीटी वेबसाईटवर जाण्यासाठी (mahadbt.maharashtra.gov.in)या लिंक वर क्लिक करून तुम्ही जाऊ शकता.

Rushi Bhosle

https://hellosambhajinagar.com/I am a Marathi Blogger, Marathi YouTuber and Owner/Founder of https://thodkyaatnews.com/. 4 Years of Professional Blogging And YouTube experience.

Leave a Comment