प्रतापगड किल्ल्याविषयी माहिती Pratapgad Fort Information In Marathi

By Rushi Bhosle

Updated on:

Pratapgad Fort Information In Marathi

नमस्कार मित्रांनो आज आपण प्रतापगड किल्ल्याविषयी माहिती सांगणार आहोत Pratapgad Fort Information In Marathi तर महाराजांचा इतिहास व छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा कोथळा कसा बाहेर काढला होता त्याचा पूर्ण इतिहास आज आपण पाहणार आहोत व प्राचीन काली मंदिरा देखील आज ह्या लेखातून पाहणार आहोत तर ही पोस्ट शेवटपर्यंत वाचा म्हणजे छत्रपती शिवरायांचा इतिहास तुम्हाला कळेल.

किल्ल्याचे नाव प्रतापगड किल्ला
संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज
स्थापना इ. स. १६५६
प्रकार गिरिदुर्ग
डोंगररांगा सह्याद्री
ठिकाण सातारा जिल्हा ( महाराष्ट्र )
गड चढण्याची श्रेणी सोपी
उंची 3556 फुट
किल्ल्याचे दोन भाग मुख्य किल्ला , बालेकिल्ला
किल्ल्यावरील ठिकाणे शिव मंदिर, तुळजा भवानी मंदिर, राजमाता जिजाऊ वाडा, नागरखाना, बुरुज आणि अफझल खानची कबर.

 

प्रतापगड किल्ला हा समुद्रसपाटीपासून 3500 फूट इतका उंचीवर आहे

प्रतापगडाचे ऐतिहासिक महत्त्व म्हणजे अफजलखानाचा मृत्यू छत्रपती शिवाजी महाराजांनी कोथळा बाहेर काढला होता म्हणजे अफजलखानाचा मृत्यू देखील प्रतापगडावर झालेला आहे

प्रतापगड किल्ला हा पश्चिम भागातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यात येथील डोंगरी किल्ला आहे

प्रतापगड किल्ला हा पर्यटक स्थळ देखील आहे व पर्यटकांना एक मोठा आनंद उत्साह व छत्रपती शिवरायांचा इतिहास माहिती जाणून घेण्यासाठी पर्यटक स्थळ येथे येतात

16 59 रोजी प्रतापगडाच्या लढाईमुळे प्रतापगडाचे ऐतिहासिक महत्त्व आहे

प्रतापगडावर गेल्यानंतर तुम्ही तुमच्या टू व्हीलर किंवा फोर व्हीलर तुम्ही प्रतापगडावर नेऊ शकता व तिथे पार्किंगची सुविधा आहे तुम्ही तिथे गाडी पार्क करू शकता व तिथे मागच्या बाजूला एक प्रवेशद्वार आहे तिथून तुम्ही पुढे प्रतापगडावर जाऊ शकतात

प्रतापगड किल्ला हा ज्या डोंगरावर आहे पूर्वी त्या डोंगराला ढुरप्या डोंगर असे म्हणतात.

प्रतापगडाचा इतिहास

छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगड जिंकण्या अगोदर हा प्रतापगड किल्ला हा आदिलशाहीच्या ताब्यात होता व जावळीचा चंद्रराव मोरे हा आदिलशाहीचा सरदार होता

प्रतापगडाचे जावळीचे चंद्रराव मोरे हे प्रतापगड किल्ल्याचे सुभेदार देखील होते

छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळीच्या चंद्रराव मोरेला विनंती केली होती तुम्ही हिंदू आहार तर स्वराज्याचा स्वामिल व्हा जावळीच्या चंद्रराव मोरे यांनी छत्रपती शिवरायांना नकार दिला व छत्रपती शिवाजी महाराजांनी काही सैन्यांसोबत प्रतापगड युद्ध केलं व प्रतापगड किल्ला जिंकून घेतला

तर इकडे चंद्रराव मोरे चा पराभव झाला व तिकडे आदिलशाही हादरून गेली व विजापूरच्या दरबारामध्ये मोठी गर्दी झाली व( बडी बेगम) अफजलखानाची आईने सांगितलं

(किसी भी हालत मे मुझे छत्रपती शिवाजी का सिर चाहिये)

तर अफजलखानाने शिवाजी महाराजांना भेटण्याचा पैगाम पाठवला कारण अफजलखानाला एक जुना बदला देखील घ्यायचा होता अफजलखानाच्या भावाचा मृत्यूचा बदला व त्याने छत्रपती शिवाजी महाराजांना भेटण्यास ठरवलं

एक मुलाखत घेण्यासाठी महाराजांना विनंती केली व खूप सारे घोडदळ व सैनिक व तोफा घेऊन अफजलखान महाराष्ट्रात आला कारण अफजलखानाला छत्रपती शिवाजी महाराजांचा वध करायचा होता पण ते तो यशस्वी ठरला नाही ठरवल्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज एकूण प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजलखानाला भेटण्यास गेले हो तिथे एक या तंबूमध्ये त्यांना भेटण्यासाठी जागा केलेली होती

पण पूर्वी त्या काळीचे वकील दोघेही भेटतील पण दोघांच्याही हातात किंवा सोबत काही शस्त्र नसतील अस दोघांच्या वकिलांनी ठरवले व छत्रपती शिवाजी महाराज हे अफजलखानाला भेटण्यास गेले व अफजलखाना म्हणला

( आव शिवाजी आव गले लग जाओ)
अस मणत
अफजलखान छत्रपती शिवाजी महाराजांकडे आला व गळा भेट घेऊ लागला लगेच त्यांनी त्याच्या कपड्यांमध्ये लपवलेला चाकू बाहेर काढला व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठीवर वार करायला लागला पण छत्रपती शिवाजी महाराज आधीच तयारीत गेलेले होते व त्यांना या वाराच काहीही झालं नाही पण जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना समजलं की हा मला मारण्याचा प्रयत्न करत आहे तर छत्रपती शिवाजी महाराजांनी लगेच आपल्या हातात लपवलेलं (वाग नख) काढून अफजलखानाचा कोथळा बाहेर काढला व तिथेच अफजलखानाचा मृत्यू झाला असा मोठा पराक्रम गाजवत छत्रपती शिवाजी महाराजांनी जवळचे लपलेले सैनिक होते त्यांना सांगितलं हल्ला करा व अफजलखानाच्या सैनिकांना देखील ठार मारलं

जंजिरा किल्ल्याविषयी माहिती? Janjira Fort Information in marathi

प्रतापगड किल्ल्यावर पाहण्यासारखे ठिकाणीPratapgad Fort Information In Marathi

प्रतापगड किल्ल्यावर एकूण 475 पायऱ्या आहेत 96 पायऱ्या चढून वरती आल्यानंतर एक मोठं प्रवेशद्वार आहे म्हणजे गायमुख आकाराचे प्रवेशद्वार आहे गाईने तोंड फिरवल्या सारखं हे प्रवेशद्वार आहे

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातली प्रथा म्हणजे सूर्योदय होण्या पूर्वीच दरवाजे उघडले जात होते व सूर्यास्त मावळण्याच्या पूर्वीच दरवाजे बंद करण्यात येत होते असा नियम छत्रपती शिवराय यांच्या काळात होता व या नियमाचे पालन देखील आजही तिथले नागरिक करतात प्रवेशद्वाराच्या आत मध्ये गेल्यानंतर एक मोठी तोफ आहे व तिथे एक मशाल ठेवण्यासाठी दगडात बनवलेलं मशाली स्टॅन्ड देखील आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा हा प्रतापगड किल्ला जिंकला तेव्हा 1656 रोजी या गडाचे बांधकाम देखील केले
मोरोपंत इंगळे हिरोजी इंदुलकर त्यावेळी चे बांधकाम करणारे इंजिनियर होते व छत्रपती शिवाजी महाराजांनी यांच्याकडून प्रतापगड किल्ला हा बांधून घेतला

व तिथे एक मोठा पाण्याचा तलाव आहे जेव्हा त्याला तलावाचे बांधकाम चालू होतं व खोदकाम चालू होतं तेव्हा त्याच्यामध्ये सापडलेले दगड तोच दगड बांधकामासाठी वापरण्यात आला आहे

भवानी मातेचे मंदिर(Pratapgad Fort Information In Marathi)

भवानी मातेच्या मंदिराकडे जाताना तिथे पुढे एक मोठा नगर खाना आहे. छत्रपती शिवरायांनी एक भवानी मातेचे मंदिर देखील बांधला आहे भवानी मातेची मूर्ती ही खूप प्राचीन आहे आजही त्या मंदिरात नागरिक व पर्यटक गर्दी करतात

व त्याच मंदिरात सर शिवराव हंबीरराव मोहिते यांची तलवार आहे त्याच तलवारीने हंबीरराव मोहिते यांनी प्रतापगडाच्या लढाईत मोठा पराक्रम गाजवला होता

केदारेश्वर मंदिर(Pratapgad Fort Information In Marathi)

छत्रपती शिवाजी महाराजांना जेव्हा या गडाचे बांधकाम चालू होते तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना बांधकामात एक भगवान शंकराची महादेवाची पिंड सापडली होती व तेथे छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या पिंडीची स्थापन केले व तिथे नाव दिले केदारेश्वर आजही ती पिंड खूप मोठी आहे व पर्यटक तिथे आजही पाहण्यासाठी गर्दी करतात

खलबतखाणा

भगवान शंकराच्या मंदिराच्या समोरच खलबदखाना आहे शिवाजी महाराज तेथे अष्टप्रधान सोबत किंवा सैनिका सोबत चर्चा करत असत व काही महत्त्वाच्या गोष्टी तिथे सांगत असतात

व भवानी मातेच्या मंदिरापासून थोड्या दूर अंतरावर बालेकिल्ला आहे व तेथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारू महा पुतळा आहे

चोर दरवाजा

प्रतापगडाच्या एका बुरुजावरती एक चोर दरवाजा आहे जो युद्धाच्या वेळी त्या दरवाजाचा वापर केला जात होता म्हणजे जोर दरवाजातून बाहेर पडण्यासाठी तो मार्ग होता पण आता सध्याच्या सुरक्षेच्या कारणामुळे तो दरवाजा बंद केलेला आहे

कडेलोट टोक

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात एक नियम होता जो ही स्वराज्यात गद्दारी करत होता त्याला याकडे लोट टोकावरून ढकलून देण्यात येत होता व खूप मोठी शिक्षा देण्यात येत होती ती शिक्षा बघूनच कोणाची हिम्मत झाली नाही पाहिजे स्वराज्यात गद्दारी करायची असा छत्रपती शिवरायांच्या काळात नियम होता

बालेकिल्ल्यावरती सर्वात उंच जागेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा एक आश्वारू महा पुतळा आहे त्या पुतळ्याची उंची 36 फूट इतकी आहे व त्या पुतळ्याच वजन आहे 4 टन म्हणजे साडेचार हजार किलो इतकं त्या पुतळ्याचे वजन आहे पुतळ्याचे पार्ट एक एक पार्ट करून बालेकिल्ल्यावरती नेण्यात आलं होतं व तिथे त्यांना जोडून हे स्मारक उभा केलं
त्या पुतळ्याचा उद्घाटन भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू 1957 सली यांनी या पुतळ्याचे उद्घाटन केलं होतं

(टेहालटी बूरुज) (शिवप्रताप बूरूज)

प्रतापगडावर पाहण्यासाठी एक वैशिष्ट्य म्हणजे सर्वात सुंदर जागा म्हणजे हे बुरुज आहे या बुरुजाच वर्णन चौथीच्या पुस्तकांमध्ये देखील केला आहे

प्रतापगड वर जाणारे पर्यटक देखील खूप आहेत व तिथे पाहण्यासारखं व पर्यटकांना आनंद मी करण्यासारखं वातावरण आहे व तिथे पर्यटकांना खरेदी करण्यासाठी भरपूर दुकाने आहेत व त्या दुकानांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुर्त्या देखील आहेत

व प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजलखानाची कबर आहे तेथे छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा मृत्यू केला होता तेथे ती कबर आहे

प्रतापगड किल्ला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचा व धाडसाचा प्रमाण म्हणजे हा प्रतापगड किल्ला होय

FAQ

  • प्रतापगड किल्ला कोणी बांधला?

प्रतापगड किल्ला हा मारोतीपंत त्रिंबक पिंगळे यांनी बांधला होता.

  • प्रतापगड किल्ला कशासाठी प्रसिद्ध आहे?

प्रतापगड महाड रोडवर महाबळेश्वरपासून २१ किलोमीटर अंतरावर आहे. 10 नोव्हेंबर 1659 रोजी येथे अफझलखानाशी मोठी लढाई झाली असल्याने हा किल्ला अतिशय महत्त्वाचा आहे . 1656 मध्ये. शिवाजी महाराजांनी हा किल्ला बांधला.

तरी हीच होती प्रतापगड किल्ल्याविषयी माहिती धन्यवाद.

Rushi Bhosle

https://hellosambhajinagar.com/I am a Marathi Blogger, Marathi YouTuber and Owner/Founder of https://thodkyaatnews.com/. 4 Years of Professional Blogging And YouTube experience.

Leave a Comment