शनि शिंगणापूर सविस्तर माहिती-Shani Shingnapur Temple

By Rushi Bhosle

Updated on:

शनि शिंगणापूर सविस्तर माहिती-Shani Shingnapur Temple

नमस्कार मित्रांनो हॅलो संभाजीनगर डॉट कॉम या वेबसाईटवर तुमचे स्वागत आहे तर चला आज आपण पाहत आहोत शनिशिंगणापूर येथे शनि देवाची माहिती खाली दिलेल्या प्रमाणे सविस्तर माहिती पहा.

शनिशिंगणापूर मंदिर हे अहमदनगर जिल्ह्यात आहे शिर्डी पासून 65 किलोमीटर अंतरावर शनिशिंगणापूर मंदिर आहे व आजही शनीची मूर्ती ही चक्क दगडामध्ये आहे शनिशिंगणापूरचा रहस्य म्हणजे तिथे कुठल्याही घराला दरवाजा नाही कारण शनि देवच असे त्यांचे रक्षा करतात त्यामुळे तिथले गावकरी मंडळी आपल्या घराला दरवाजा लावत नाही असा तिथ पूर्वीचा नियमच आहे.

तर चला जाणून घेऊ शनी शिंगणापूर चा इतिहास?

शनिशिंगणापूर मंदिर हे आजही आपल्या महाराष्ट्र मध्ये खूप प्रसिद्ध आहे दूर दूर भाविक भक्तजन व पर्यटक शनि देवाच्या दर्शनासाठी येतात व शनि देवाला तेल अर्पण करतात भगवान शनी चे मंदिर हे खूप प्रसिद्ध आहे आश्चर्याची गोष्ट म्हणजे शनीची मूर्ती चक्क दगडात आहे त्यामुळे त्या दगडातच शनिदेव वास करतात . शनिशिंगणापूरची यात्रा ही खूप मोठी असते या यात्रेमध्ये खूप गर्दी पाहायला मिळते शनि देवा च्या प्रति भाविक भक्तांचा खूप मोठा विश्वास आहे भक्तजन सांगतात की शनिदेव आमची रक्षा करतात.

शनिशिंगणापूर हे गाव या गावांमध्ये असलेले घराला कुठल्याही घराला दरवाजा नाही?

Shani Shingnapur Temple शनिशिंगणापूर मध्ये असलेले गाव त्या गावांमध्ये कुठल्याही घराला दरवाजा व कुलूप नाही असं मानलं जातं की शनिदेव त्यांची रक्षा करतात चोरांपासून त्यांची रक्षा करतात शनि देवावर भाविक भक्तांचा खूप मोठा विश्वास आहे घराला दरवाजा नसतानाही या कारणाने आजही कुठल्याही घरी कुठल्याही प्रकारची चोरी व काही सामान गेले नाही . असं सांगितलं जातं की चोराने चोरी केल्यावर चोर हा आंधळा होतो अशी शनि देवाची महिमा आहे.

शनिवारी व शनि अमावस्या दिवशी शनिश्वर जयंती दिवशी खूप गर्दी असते दर शनिवारी भक्तजन शनि देवाच्या दर्शनासाठी जातात शनी जयंती दिवशी तर खूप मोठी यात्रा भरते त्या यात्रेमध्ये अनेक प्रकारचे दुकाने लागतात. दर शनिवारी शनि देवाला प्रसन्न करण्यासाठी भक्तजन तेल घेऊन शनि देवावर अर्पण करतात असं मानलं जातं की आपल्यावर शनिचा।दूरुर्भाग्य प्रभाव असलेले नष्ट होतात.

शनि जयंती निमित्त ची यात्रा ही भाविक भक्तांना एक मोठी उत्साह देणारी यात्रा असते त्या यात्रेमध्ये भक्तजन देवाची पूजा अर्चना करून शनि देवावर तेल चढवतात व आपली प्रार्थना शनि देवाला सांगतात व शनिदेव त्यांची प्रार्थना पूर्ण करतात असा आजही मान्यता आहे. भक्त जनाशी अशी मान्यता आहे की शनिदेव त्यांचे आयुष्य सुख समाधाने व भरभराटून टाकतात.

पुणे दगडूशेठ हलवाई गणपती विषयी संपूर्ण माहिती-Dagdusheth Ganpati

शनिशिंगणापूर ची रहस्यमय गोष्ट?

Shani Shingnapur Temple शिंगणापूर च्या इतिहासाची गोष्ट सांगितली तर खूप काही वर्षांपूर्वी असं सांगितलं जातं की खूप काही वर्षांपूर्वी एका चरवाही नावाच्या व्यक्ती हा मूर्ती घडवण्याचं काम करत होता खूप काही दगड पडलेले होते व त्यामध्ये पडलेल्या दगड एक उचलला व धारदार शस्त्राने छन्नीने दगडाला कोरू लागला छन्नी लागतात दगडामधून रक्त वाहू लागले गावकरी मंडळी व तो माणूस दंग झाला असा दगडा मधून रक्त कसं काय वाहू लागलं याने सगळे आश्चर्यचकित झाले। त्याचं रात्री त्या चरवाही नावाच्या स्वप्नात शनिदेव आले व चरवाहि त्यांना नमस्कार केले व म्हणाले देवा तुम्ही व शनिदेव त्या चारही माणसाला सांगू लागले की माझी मूर्ती स्थापन कर व माझी पूजा अर्चना कर व मला दररोज तेल चढव असं त्या माणसाला शनि देवाने सांगितले व प्रत्येक दिवशी तो चरवाही माणूस शनि देवाची पूजा अर्चना करू लागला.

शनि देवाची मूर्ती ची उंची सुमारे 5 फूट 6 इंच आहे मूर्तीच्या सभोवती चौरस ओटा बांधलेला आहे. शनि देवाची मूर्ती ही उभ्या स्थितीत असून शनि देवाच्या मूर्ती शेजारीच एक हनुमानाची देखील मूर्ती आहे. शनि देवाच्या मूर्तीच्या डोक्यावर एक सोन्याचा कलश आहे व त्या कलशातून शनि देवाला तेल अर्पण केले जाते. जे काही भक्तजण दुकानांमधून तेल घेतात व रांगेत उभे राहून शनि देवाला तेल घालण्यासाठी तेल घेतात ते तेल एक चौकोनी ओट्यामध्ये ओतले जाते व ते पाईपलाईनच्या माध्यमातून शनिदेवाच्या मूर्तीवर कलशातून पडते. व भक्तजन त्याच रांगेत उभे राहून शनि देवाचे दर्शन करून बाहेर पडतात.

Shani Shingnapur Temple असं मानलं जातं की शनि देवाची पूजा ही फक्त पुरुषही करू शकतात. महिलाला शनि देवाची पूजा करणे चालत नाही दर शनिवारी व शनि अमावस्या असेल तर शनि देवाला चढवण्यासाठी रोटीच्या पानाचा व फुलाचा हार बनवला जातो व तो हार शनि देवाच्या मूर्तीवर चढवण्यात येतो. त्या फुलाच्या हाराचच शनि देवाला मान्यता आहे.

शनि देवाची उत्सव जत्रा?

तसं पाहिलं तर प्रत्येक शनिवारी व शनि अमावस्या असेल शनि जयंती असेल या प्रत्येक दिवशी शनि देवाचे दर्शन घेण्यासाठी अनेक भाविक भक्तांची गर्दी पाहायला मिळते पण शनि जयंती व शनी अमावस्याला जास्त गर्दी पाहायला मिळते शनि जयंतीला खूप मोठा उत्सव साजरा केला जातो वेगवेगळ्या फुलाच्या आकाराने शनिदेवाचे स्वभावताला चौरस ओटा आहे त्याला सजवले जातो शनि देवाचा अभिषेक हा स्वच्छ गंगा च्या पाण्याने केला जातो व नंतर तेलाचा अभिषेक केला जातो हा उत्सव पाहण्यासाठी शनि जयंती दिवशी लाखोच्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात.

शनिशिंगणापूर मंदिराचे नियम?

शनि देवाच्या दर्शनासाठी काही नियम देवस्थानाच्या वतीने घालण्यात आलेले आहेत.
1) शनि देवाची पूजा ही फक्त पुरुषानेच करावी?

2) भाविक भक्तांनी शनि देवाच अभिषेक हा पवित्र स्वच्छ गंगाचे किंवा विहिरीच्या पाण्यानेच करावा ?

3) अभिषेक करत असताना पुरुषांनी आंघोळ करून ओल्या कपड्याने शनि देवाचा अभिषेक करावा?

4) शनि देवाच्या मूर्तीला तेलाने अभिषेक करावा ?

5) व शनि देवाच्या मूर्तीला रुईच्या फुलाचा हारच घालून अभिषेक करावा ?

असे पाच नियम देवस्थानाच्या वतीने घालण्यात आलेले आहेत.

परंतु 2016 व 17 साली उच्च न्यायालयाने घोषित केले आहे की महिलाही शनी देवाचे दर्शन घेऊ शकतात.

शनिशिंगणापूर जवळील इतर पाण्यासारखे पर्यटक स्थळे?

अहमदनगर जिल्ह्यातील जगप्रसिद्ध शिर्डी साईबाबा चे मंदिर
पाण्यासारखे आहे Shani Shingnapur Temple पासून शिर्डी साईबाबा चे मंदिर हे 65 व 70 किलोमीटर अंतरावर आहे.

नेवासा तालुका मध्ये असलेले देवगड चा मंदिर हेही खूप पाहण्यासारखे ठिकाण आहे.

याशिवाय वेरूळ अजिंठा लेण्यादेखील येथूनच काही तासाच्या अंतरावर आहेत.

Rushi Bhosle

https://hellosambhajinagar.com/I am a Marathi Blogger, Marathi YouTuber and Owner/Founder of https://thodkyaatnews.com/. 4 Years of Professional Blogging And YouTube experience.

Leave a Comment