शेतात जाण्यासाठी रस्ता नाही? काळजी करू नका; असा कायदेशीर पद्धतीने मिळवा रस्ता; पहा नियम..!

By Rushi Bhosle

Updated on:

Shet Rasta Kayda

Shet Rasta Kayda : आपल्या शेतामध्ये सर्व सोयी सुविधा अगदी व्यवस्थित रित्या उपलब्ध असतील परंतु शेतामध्ये जाण्यासाठी येण्यासाठी रस्ताच नसेल तर त्या शेताचे महत्त्व कमी होते कारण की शेतामधील प्रत्येक काम आपण करतो त्यावेळी शेतामध्ये जाण्यासाठी रस्त्याची आवश्यकता भासते. ट्रॅक्टरने आपण शेताची मशागत करतो तसेच आपला शेत बाजारपेठेमध्ये पाठवण्यासाठी त्या रस्त्यावरूनच आपण जातो तसेच इत्यादी रोजची कामे असतात ते आपण त्या रस्त्यावरून जाऊन येऊन करू शकतो.

परंतु कित्येकदा आपल्याला या गोष्टी सुद्धा दिसून आल्या आहेत की शेतामध्ये जाण्यासाठी रस्ता अजिबात नसतो अशावेळी शेतकऱ्यांना विविध त्रासाला नक्कीच सामोरे जावे लागत आहे (shet rasta niyam). कित्येकदा शेतकरी इतर शेतकऱ्यांच्या रस्त्यांमधून जाण्यासाठी यासोबतच येण्यासाठी रस्त्याविषयी विनवणी करत असतात, परंतु प्रत्येक ठिकाणी शेतकऱ्यांना रस्ता मिळत नाही.

शेत रस्ता योजना उद्दिष्ट

यामुळे आता शेतकरी अगदी नाईलाजाने कायदेशीर रित्या मार्ग अवलंबण्याचा प्रयत्न करतात. यामध्ये मात्र तुम्हाला तुमच्या शेतामध्ये जाण्यासाठी योग्य तो रस्ता नसेल तर अशावेळी तो रस्ता मिळवायचा असेल तर तुम्हाला अर्ज सादर करावा लागणार आहे (rasta magni arj). यासोबतच काही आवश्यक कागदपत्रे सुद्धा त्या ठिकाणी सादर करावी लागतील. तर चला, याबाबत आज आपण तपशील जाणून घेऊया.

शेत रस्त्यासाठी असा अर्ज करावा: तुमच्या शेतामध्ये जाण्यासाठी तसेच येण्यासाठी तुमच्या हक्काचा रस्ता तुम्हाला हवा असेल तर जमीन महसूल अधिनियम 1966 कलम 143 प्रमाणे आपण बघितले तर नवीन शेतामधील रस्त्यासाठी तुम्हाला अर्ज करता येणार आहे. अशावेळी आपण बघितले तर शेतकऱ्यांना शेजारी असलेल्या शेतकऱ्यांच्या बांधावरून हे जा करण्यासाठी रस्ता शासकीय मार्गातून मिळतो (shet rasta magni arj in marathi). परंतु या प्रक्रियेसाठी नक्कीच शेतकऱ्यांना तहसीलदाराकडे लेखी स्वरूपात अर्ज सादर करावा लागणार आहे आणि हे खूप महत्त्वाचे आहे.

शेत रस्ता कायदा

अर्ज सादर करत असताना सर्वात प्रथम तालुक्यामध्ये तुम्ही त्या ठिकाणी रहिवासी असणे गरजेचे आहे. याच तालुक्यामध्ये तहसीलदार यांच्या नावाने तयार केलेले लिखित स्वरूपातील अर्ज सादर करावा लागेल. तिथून पुढे तुम्हाला काही महत्त्वाच्या बाबी सुद्धा त्या ठिकाणी नमूद करावे लागतील. त्या म्हणजे कोणाचा आधार घेऊन तुम्ही अर्ज करत आहात (shet rasta magni yojana). या विविध गोष्टी तुम्हाला नमूद करणे बंधनकारक असेल म्हणजे महाराष्ट्र शासन अधिनियम 1966 कलम 143 च्या माध्यमातून बघितले तर नवीन शेत रस्त्यासाठी आपल्याला अर्ज सादर करावा लागणार आहे. ही बाब त्या ठिकाणी नक्कीच नमूद केली आहे.

तिथून पुढे आपण बघितले तर अर्जाचा जो काही महत्त्वाचा विषय आहे तो त्या ठिकाणी मांडावयाचा आहे आणि व्यवस्थितरित्या त्या ठिकाणी अर्ज सादर करायचा आहे. अर्जामध्ये र्ज करणार्‍या व्यक्तीचे नाव तसेच त्याच्या शेताविषयी संबंधित संपूर्ण माहिती सादर करावी लागेल.

अर्ज करताना या गोष्टी सादर करणे बंधनकारक

अर्ज करणारे व्यक्तीच्या नावासोबतच त्या ठिकाणी गावाचे नाव तसेच संपूर्ण पत्ता त्या ठिकाणी लिहायचा आहे; तिथून पुढे अर्ज करणाऱ्या व्यक्तीने त्याच्या शेतालगतच्या जमिनीचा संपूर्ण असा तपशील देणे बंधनकारक आहे. म्हणजे सर्वात प्रथम शेतीच्या गट क्रमांक यासोबतच एकूण क्षेत्र तसेच आकारला जाणारा क्षेत्रफळ, इत्यादी बाबींविषयी माहिती देणे गरजेचे आहे.

आता समजा, एखादा शेतकरी या ठिकाणी त्याची शेत जमीन सामायिक क्षेत्रांमध्ये येत असेल तर अशावेळी, त्या शेतकऱ्याच्या वाटेने की, किती क्षेत्रफळ येत आहे, त्या गोष्टी सुद्धा नमूद करावे लागतील. यासोबतच संबंधित शेतीची चतुहसीमा म्हणजे जी काही शेतजमीन आहे त्याच्या आजूबाजूला कोणत्या शेतकऱ्यांच्या शेतजमीन आहेत, त्याचे संपूर्ण अगदी तपशील द्यावी लागेल. त्या शेतकऱ्यांचे नाव, पत्ता, तसेच शेतकऱ्याच्या शेत जमिनीच्या गट क्रमांक, इत्यादी माहिती द्यावी लागेल.

अर्जासोबत कोणती कागदपत्रे जोडावीत?

1- यामध्ये आता आपण बघितले तर अर्ज करणारे व्यक्तीचा त्यासोबतच शेजारील शेतकऱ्यांच्या शेतीच्या बांधावरून जाण्यासाठी त्या ठिकाणी रस्त्याची मागणी केली गेली आहे त्यासाठी कच्च्या जमिनीचा नकाशा आपल्याला जोडावा लागणार आहे.

2- अर्ज करणारे व्यक्तीच्या जमिनीचा या ठिकाणी चालू वर्षातील सातबारा सुद्धा अशावेळी सादर करावा लागणार आहे. तीन महिन्याच्या आतील हा सातबारा असणे बंधनकारक आहे.

3- शेजारील आजूबाजूला त्या ठिकाणी जे कोणी शेतकरी असतील त्यांचे संपूर्ण नाव तसेच पत्ता आणि त्यांच्या शेतजमिनीचा पूर्णपणे तपशील द्यावी लागेल.

4- समजा एखाद्या अर्जदाराच्या जमिनीचा त्यासोबतच शेजारील शेतकऱ्यांच्या शेतीच्या बांधावरून जाण्यासाठी त्या ठिकाणी रस्त्याची मागणी केली गेली आहे त्यासाठी कच्च्या जमिनीचा नकाशा आपल्याला जोडावा लागणार आहे.

संपूर्ण अर्ज झाल्यानंतर तिथून पुढे, तहसीलदार काय प्रक्रिया करतात?

संपूर्ण अर्ज झाल्यानंतर तिथून पुढे, शेतकऱ्यांनी तहसीलदाराकडे अर्ज सादर करावा आणि तिथून पुढे जो काही अर्ज आहे, तो शेतकरी तसेच ज्या त्या शेतकऱ्याच्या शेती जमिनीच्या बांधावरून रस्ता जाणार आहे, अशा सर्व शेतकऱ्यांना याबाबतचे विशेष असे जाहीर नोटीस पाठवले जाते आणि सर्वांचे मन्याने काय आहे ते मांडण्याची संधी या ठिकाणी दिली जात आहे.

Rushi Bhosle

https://hellosambhajinagar.com/I am a Marathi Blogger, Marathi YouTuber and Owner/Founder of https://thodkyaatnews.com/. 4 Years of Professional Blogging And YouTube experience.

Leave a Comment