शिर्डी साईबाबा मंदिरा विषयी माहिती? Shirdi Sai Baba Temple History In Marathi

By Rushi Bhosle

Updated on:

शिर्डी साईबाबा मंदिरा विषयी माहिती

नमस्कार मित्रांनो आज आपण शिर्डीमध्ये असलेले साईबाबा मंदिराविषयीShirdi Sai Baba Temple History In Marathi माहिती पाहणार आहोत तर ही पोस्ट शेवटपर्यंत वाचा म्हणजे साईबाबा चा इतिहास तुम्हाला सविस्तर कळेल.

महाराष्ट्र मध्ये अनेक प्रकारच साईबाबा चे मंदिर आहेत पण शिर्डी मध्ये असलेले साईबाबा चे मंदिर हे खूप वेगळे आहे तर चला आपण या शिर्डी मध्ये असलेल्या साईबाबांच्या मंदिराविषयी माहिती पाहूया खालील प्रकारे दिलेली माहिती सविस्तर पहा.

शिर्डी साईबाबा मंदिरा विषयी माहिती?

या राज्याचा इतिहास इतर राज्यांपेक्षा वेगळा आहे कारण छत्रपती शिवाजी महाराज महाराजांसारखे अनेक योद्धा या आपल्या धरतीवर रणभूमीवर आपला विजय मिळून पराक्रम गाजवत आपल्या या महाराष्ट्रात आपलं नाव कोरलं तर असेच अनेक भरपूर मंदिरे आहेत तुळजापूर ,पंढरपूर, कोल्हापूरची महालक्ष्मी ,जेजुरी ,असे भरपूर काही मंदरे आपल्याला या राज्यात पाहायला मिळतात आपल्या राज्याचा इतिहास हा काही छोटा नाही खूप मोठा इतिहास आहे जो एक या पोस्टमध्ये लिहिला जाणार नाही त्यासाठी हजारो नागरिक आपल्या राज्याचा इतिहास लिहिण्याचा प्रयत्न करत आहेत तर मीही असाच एक छोटासा शिर्डी मध्ये असलेले साईबाबा चे मंदिर यांच्या विषयी माहिती सांगण्याचा प्रयत्न करत आहे.

शिर्डी साईबाबा Shirdi Sai Baba चे मंदिर हे मुंबईपासून तीनशे किलोमीटर अंतरावर आहे शिर्डी साईबाबा चे मंदिर खूप मोठे आहे व मंदिरामध्ये साईबाबा चा मंदिराचा कळस सोन्याचा आहे . साईबाबाच्या दर्शनासाठी अनेक भाविक भक्त येतात साईबाबाला हे फक्त गुलाबाचे फुलच आवडते फुल आहे गुलाबाचा फुल घेऊन साईबाबाच्या दर्शनाला लोक जातात.

साईबाबा मंदिरात खाण्यापिण्यासाठी सुविधा?

साईबाबाच्या मंदिरात जवळच भाविक भक्तांसाठी खाण्यापिण्याची देखील सुविधा केली आहे 24 घंटे ही तेथे जेवणाची सुविधा केली.

साईबाबाचं आवडतं फुल (गुलाब) आणि त्यात गुलाबापासून बनवलेली अगरबत्ती
आहे साईबाबाला जो चढवलेला गुलाबाचा हार आहे त्या हराने अगरबत्ती तयार होते म्हणून पर्यटक व भाविक भक्त आवडीने तेथे असलेल्या दुकानातून अगरबत्ती घेतात आणि आपल्या घरात लावतात अगरबत्तीचा सुगंध हा खूप वेगळा आहे मनाला शांती देणारा व सगळ्या घरात सुगंध पसरणारा.

साईबाबा चा धर्म?Shirdi Sai Baba

शिर्डी मध्ये असलेले साईबाबा हे एक सामान्य माणसासारखे राहत होते साईबाबांना गावातली माणसे फकीर ही म्हणायची कारण साईबाबा हे मुस्लिम नासारखे कपडे घालायचे साईबाबा हे कुठल्याच धर्मा जातीचे नाही साईबाबांना सर्व धर्म सारखे आहे म्हणून साईबाबांच्या दर्शनासाठी सर्व प्रकारचे लोक दर्शनात जातात.

शिर्डी मध्ये असलेले साईबाबा हे महान व्यक्तिमत्व गुरु होते पण ते कधी दाखवत नव्हते त्यांच्याकडे अपारशक्ती होती असं मान्यता आहे की भगवंताचा दुसरा अवतार साईबाबा होते अनेक लोकांची मदत व लोकांना ज्ञान द्यायचा प्रयत्न साईबाबा करत होते शिर्डी हे गाव खूप छोटं होतं पण तिथे साईबाबा राहत होते साईबाबांनीच शिर्डीचा उद्धार केला व तिथे असलेल्या लोकांना चांगले जीवन जगण्याचा मार्ग दाखवला.
व अनेक प्रकारचे लोकांना मदत केली साईबाबा चे भक्त हे हिंदू आणि मुस्लिम देखील होते कारण साईबाबा हे कुठल्याही प्रकारच्या जाती-धर्माचे भेद पाळत नव्हते साईबाबा हे हिंदू धर्मातले अनेक ग्रंथ व अनेक धार्मिक गोष्टी त्यांना माहीत होते गीता ही त्यांना माहीत होती ज्ञानेश्वरी ही त्यांना माहीत होते म्हणून साईबाबा ही ना हिंदू आहे ना मुस्लिम आहे सर्व जातींना साईबाबा समान मानत होते म्हणून आजही साईबाबाच्या दर्शनासाठी सर्व प्रकारचे लोक जातात.

गुरुवारी हा शिर्डी मधले साईबाबा चा आवडता दिवस आहे गुरुवारी अनेक भाविक साईबाबांच्या दर्शनासाठी येतात
महाराष्ट्रातील मुख्य स्थान म्हणजे साईबाबा चे मंदिर म्हणून भाविक आवडीने व उत्साहान श्रद्धा नसाईबाबाच्या दर्शनाला येतात शिर्डी साईबाबा चे मंदिर जगात एवढे प्रसिद्ध आहे की प्रत्येकाला या मंदिराविषयी माहिती आहे साईबाबा चे मंदिर हे खूप मोठे आहे असं मानलं जातं की या महाराष्ट्रात

( सगळ्यात पैशावाला मंदिर आहे तर हे शिर्डी मधले साईबाबा चे मंदिर आहे)
अनेक भाविक लोक या मंदिरासाठी दान देतात साईबाबांचा आशीर्वाद घेण्यासाठी जगातल्या कोपऱ्या कोपऱ्यातून भाविक भक्त येतात.

साईबाबा ची समाधी?Shirdi Sai Baba

( शिर्डी साईबाबा चे मंदिर हे

अहमदनगर जिल्ह्यात आहे या जिल्ह्यात साईबाबा चे मंदिर आहे म्हणून सगळ्यांना शिर्डी ही माहित आहे .शिर्डी म्हणलं की सगळ्यांना साईबाबा चे मंदिर आठवतं. पुराण काळात सांगितले जाते की साईबाबा हे १९ शतकात शिर्डी येथे राहत होत. 1918 स* शिर्डीमध्ये साईबाबांनी Shirdi Sai Baba समाधी घेतली.

साईबाबा हे एक सामान्य माणसासारखे राहत होते सगळ्यांसोबत राहणे खाणे झोपणे काम करणे असे साईबाबा राहत होते पण कोणाला साईबाबा चे चमत्कार माहीत नव्हता जेव्हा काही संकट येईल व काही अधर्म होईल तर साईबाबा आहे चमत्कार दाखवा ते संकट दूर करायचे गावातील लोक हे साईबाबांना एक ढोंगी फकीर म्हणून बोलायचे पण साईबाबा चा खरा चमत्कार हा कोणालाच माहीत नव्हता

साईबाबांचा चमत्कार?

चक्क साईबाबांनी एका माणसाच्या घरी भिक्षा मागण्यासाठी गेले व त्याला भिक्षा मागू लागले तर तो माणूस म्हणाला की बाबा आम्हीच दोन-तीन दिवस झाले उपाशी आहोत तुला काय खायला घालणार मग असं म्हणून तो माणूस घरात गेला आणि कोपऱ्यात एका गाठोड्यात पडलेले तांदूळ घेऊन आला आणि साईबाबाला म्हणाला माझ्याकडे एवढेच आहे यापेक्षा मी तुम्हाला काही देऊ शकत नाही तर साईबाबा म्हणाले बाळा तू दोन-तीन दिवस झाले उपाशी आहे चल भोजन करून घे त्या माणसाच्या मनात विचार आला की हा माझ्या घरी भीक्षा मागण्यासाठी आला आहे .

आणि हा काय मला जेवण घालणार तर समोरच एक चूल होती व त्या चुलीवर पितळाचे भांडे होते व त्या भांड्यात पाणी होते साईबाबांनी ते दिलेले तांदूळ त्या पाण्यात टाकले आणि त्या पाण्याला हाताने ढवळले व त्या पाण्यात त खीर तयार झाली त्या खिरीचा सुगंध एवढा दूरवर पसरला की सगळे गावातले लोक हळूहळू हळूहळू साईबाबा कडे येऊ लागले .
लोक येतच पाहता तो माणूस म्हणाला येवडुशी खीर एवढे सगळे कसे काय खानार पण साईबाबा चा चमत्कार गावातले सगळे लोक जेवले तरीही भांड्यात खीर तशीच होती असा आहे साईबाबा चमत्कार
जितकी लोक जेवतील तेवढेच अन्न त्या भांड्यात असायचं गावातले लोक हे शिर्डी साईबाबा ला मानू लागले अनेक चमत्कार आहे साईबाबांचे ते आपण शब्दातही सांगू शकत नाही

शिर्डी साईबाबांचा इतिहास?Shirdi Sai Baba

शिर्डी साईबाबा जेव्हा शिर्डीला आले होते तेव्हा ते फक्त सोळा वर्षाचे होते व नंतर ते शिर्डी मधील राहू लागले आणि 1918 मध्ये साईबाबांनी शिर्डीमध्ये समाधि घेतली साईबाबांचा जन्म कुठे झाला व त्यांची जन्मभूमी कोठे आहे कुठल्याही प्रकारचा इतिहास कोणाला माहित नाही अचानकच देव प्रकट झाल्या वाणी साईबाबा हे शिर्डी मध्ये आले.
शिर्डी मध्ये साईबाबांचा पुतळा हा खूप सुंदर आहे व साईबाबांच्या डोक्यावर एक सोन्याचा छत्री देखील आहे व खाली साईबाबांची समाधी आहे साईबाबाच्या आत मधलं मंदिर हे सोन्याचा आहे साईबाबाच्या मूर्तीला पाहिलं तर मनात एक आनंद व शांती निर्माण होते भक्ती भावाने नामस्मरण भाविक भक्त करतात.
साईबाबांच्या दर्शनासाठी तीन किंवा चार तास लागतात खूप गर्दी असते गुलाबाचे फुल घेऊन साईबाबाच्या चरणावर ठेवून आपण आपली प्रार्थना माघावी व मनोकामना साईबाबा हे पूर्ण करतात.

शिर्डीच्या साईबाबांचे वैशिष्ट्ये?

शिर्डी साईबाबा चे मंदिर हे जगात खूप प्रसिद्ध आहे इथे येणारे अनेक भाविक भक्तांची इच्छा साईबाबा ही पूर्ण करतात अनेक भक्तांना काही कोणत्याही प्रकारचे आजार असले तर साईबाबाच्या दर्शनास गेल्यावर एकदा डोळे भरून साईबाबाच्या मूर्ती कडे पाहावे व त्यांना सांगावे तुमच्या मनातील गोष्ट त्यांच्यापर्यंत पोहोचली पाहिजे एवढे मनातून श्रद्धा बाळगून प्रार्थना करावी साईबाबा तुमची प्रार्थना लगेच पूर्ण करतात व तुमचे आरोग्य सुंदर व चांगले बनवतात व तुमच्या आजार हे नाहीसे होते साईबाबा हे एवढे आश्चर्यचकित आहे. की कोणताही माणूस राग क्रोध इर्षा गर्वाने असला तर साईबाबाच्या मंदिरात तो शांतता व नम्रपणे होऊनच जातो.

शिर्डी साईबाबा ला कसे पोहोचावे.?

Shirdi Sai Baba मंदिरात भेट देण्यासाठी अनेक प्रकारचे सुविधा आहे बस रेल्वे रिक्षा व प्रायव्हेट गाडी देखील तुम्ही घेऊन जाऊ शकतात तुमची प्रायव्हेट गाडी करूनही शिर्डी साईबाबाच्या मंदिरात जाऊ शकतात व रिक्षाने किंवा बसणे देखील जाऊ शकतात तिथे साईबाबाच्या मंदिरात पार्किंगची सुविधा आहे तुमची टू व्हीलर किंवा फोर व्हीलर तिथे गाडी पार्क करून तुम्ही थेट साईबाबाच्या मंदिरात वर जाऊ शकतात व साईबाबाच्या दर्शनासाठी रांगेत उभे राहून दर्शन घेऊ शकतात.

शिर्डी मध्ये असलेले साईबाबांच्या मंदिराविषयी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे मित्रांनो तुम्हाला जर ही पोस्ट आवडली असेल तर तुम्ही तुमच्या ग्रुप वर किंवा मित्रांसोबत देखील शेअर करू शकतात धन्यवाद.

Rushi Bhosle

https://hellosambhajinagar.com/I am a Marathi Blogger, Marathi YouTuber and Owner/Founder of https://thodkyaatnews.com/. 4 Years of Professional Blogging And YouTube experience.

Leave a Comment