शिवविचार_प्रतिष्ठान
२५ आॅक्टोबर इ.स.१६४५
छञपती शिवराय लाल महल येथे मुक्कामी.
२५ आॅक्टोबर इ.स.१२९६
संत ज्ञानेश्वरांनी समाधी घेतली.
२५ ऑक्टोबर इ.स.१६७०
मोरोपंत पिंगळे पेशवे पंतप्रधान यांनी शिवनेरी जिंकण्यासाठी शिकस्त केली पण त्यात त्यांना अपयश आले,
पण त्यांनी पुढे घुसून नाशिकजवळील ब्रह्मगिरी उर्फ त्रिंबकगड जिंकला.
इ.स. १६३३ मध्ये त्रिंबक किल्ल्याचा किल्लेदार मोगलांकडे गेला होता.
इ.स. १६३६ मध्ये शहाजी राजांचा माहुली येथे पराभव झाल्यावर त्रिंबकगड मोगलांचा सेनापती खानजमान ह्याच्या हवाली केला गेला.
इ.स. १६७० मध्ये शिवरायांचे पेशवे मोरोपंत पिंगळे यांनी ब्रम्हगिरी किल्ला जिंकून घेतला.*
इ.स १७१६ मध्ये शाहूने मोगलांकडे किल्ल्याची मागणी केली, पण ती फेटाळली गेली. इ.स. १७३० मध्ये कोळ्यांनी बंड करून तो किल्ला घेतला. पुढे १८१८ पर्यंत ब्रम्हगिरी किल्ला पेशव्यांच्या ताब्यात होता.*