Shivneri Fort Information in Marathi-शिवनेरी किल्ल्याची माहिती

By Rushi Bhosle

Updated on:

Shivneri Fort

Shivneri Fort नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला शिवनेरी किल्ल्याविषयी माहिती सांगणार आहे तर ही पोस्ट शेवटपर्यंत वाचा म्हणजे शिवनेरी किल्ल्याचा इतिहास सविस्तर कळेल

स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जन्मभूमी शिवनेरी किल्ला
शिवनेरी किल्ला स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आपल्या महाराष्ट्राची शान व हजारो भगव्या मावळ्यांच्या मनात राज करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म जुन्नर येथे असलेला शिवनेरी किल्ल्यावर झाला

19 फेब्रुवारी 1630 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म जुन्नर येथे असलेला शिवनेरी किल्ला येथे झाला.

शिवनेरी किल्ला हा पुणे शहरातील जुन्नर तालुक्यात आहे.
शिवनेरी किल्ला हा पुण्यापासून 100किलोमीटर अंतरावर आहे तर जुन्नर शहरापासून 2 किलोमीटर अंतरावर आहे.

शिवनेरी किल्ल्यावर पाहण्यासारखे ठिकाणे

गडाचा पहिला दरवाजा महादरवाजा शिवनेरी किल्ल्यावर एकोपाठ एक असे सात दरवाजे आहेत
1 )महा दरवाजा

2)गणेश दरवाजा

3)पीर दरवाजा (पीर दरवाजा पार केल्यानंतर तानाजी मालुसरे यांचे उद्यान डाव्या साईटला पाहायला मिळते

4)हत्ती दरवाजा( हत्तीच्या सोंडेसारखा हत्ती दरवाजा)

5)शिपाई दरवाजा

6)फाटक दरवाजा

7)मेणा दरवाजा ( मेणा दरवाजा मधून काही शिवनेरी किल्ल्यावर राण्या होत्या राजमाता जिजाऊ अशा मेणा दरवाजातून मेणया मधे बसून जात येत होते.

असे शिवनेरी किल्ल्यावर एकूण सात दरवाजे आहेत

अंबरखाना

धान्य कोठार छत्रपती शिवरायांच्या काळात व राजमाता जिजाऊ यांच्या काळात धान्य साठवून ठेवण्यासाठी व रयतेसाठी धान्य कोठार म्हणजे अंबरखाना होता.

शिवाई देवीचे मंदिर

गडाचा पाचवा दरवाजा पार केल्यानंतर शिवाई देवीचे मंदिर आहे राजमाता जिजाऊ शिवाई देवीला नवस केला होता मला जर शूरवीर पुत्र झाला तर मी तुझे नाव ठेवीन म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव ही शिवाई देऊन शिवाजी असे ठेवण्यात आली.

गंगा जमुना पाण्याचे झरे

शिवनेरी किल्ल्यावर गंगा जमुना पाण्याची दोन झरे आहेत व दोन गंगा जमुना पाण्याच्या टाक्या देखील आहेत पर्यटकांना ते पाणी पिण्यासाठी योग्य आहे.

बदाम तलाव

शिवनेरी किल्ल्यावर बदाम आकाराचा बदाम तलाव आहे व तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचे व राजमाता जिजाऊंचे स्मारक देखील आहेत हा तलाव बदाम आकाराचा असून म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी व राजमाता जिजाऊ या तलावाला बदाम तलाव असे नाव दिले.

प्रतापगड किल्ल्याविषयी माहिती Pratapgad Fort Information In Marathi

शिवकुंज

शिवनेरी किल्ल्यावर शिव कुंज आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक आहे म्हणून त्याला शिव कुंज असे म्हणतात.

इमारत
शिवनेरी किल्ल्यावर एक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाळणा आहे तिथे ती एक भव्य दिव्य इमारत दोन मजली इमारत आहे खालच्या मधल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पाळणा आहे व राजमाता जिजाऊ यांची मूर्ती देखील आहे व छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती देखील आहे.
19 फेब्रुवारीला शिवनेरी किल्ल्यावर शिवजयंती ही खूप मोठ्या आनंदाने साजरा केले जाते ढोल नगाडे ताशा हे सगळे लावून 19 फेब्रुवारी शिवजयंती खूप मोठी आनंदाने व उत्साहाने साजरा करतात.

मनात एक कल्पना येते कसा असेल माझा राजा कसा दिसत असेल किती सुखी असेल ती प्रजा राजमाता जिजाऊ च्या पोटी एक शूरवीर छत्रपती शिवाजी महाराज यांनी जन्म घेतला व आपले नाव या इतिहासात कोरले.

कडेलोट टोक
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जो काही स्वराज्यात गद्दारी करत होते त्यांना या कडेलोट टोकावरून ढकलून देण्याचा नियम होता कडेला टोक हा खूप दरी खोल आहे कडेने टोकावरून जर खाली बघितलं तर काळजाची धडकी भरल्यासारखे होते इतका कडेलोट हा खोल आहे म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात गद्दारी करणाऱ्यांना याकडे लोक टोकावरून ढकलून देत होते नंतर कोणाचे हिम्मत झाली नाही पाहिजे स्वराज्यात गद्दारी करायची.

शिवनेरी किल्ला हा चारही बाजूने उत्तरा मध्ये वेड ला गेला आहे म्हणून पर्यटकांना देखील शिवनेरी किल्ला हा आकर्षित करतो व पर्यटक आनंदाने शिवनेरी किल्ल्यावर किल्ला पाहण्यासाठी जातात शिवनेरी किल्ल्याचा आकार हा भगवान शंकर महादेवाच्या पिंडीसारखा आहे म्हणून पर्यटकांना हा किल्ला खूप आवडतो.

पुणे शहरात गेल्यास जुन्नर तालुक्यात असलेला हा शिवनेरी किल्ला पाहण्यासाठी एकदा नक्की जा आणि या रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणावर मस्तक ठेवून आपले जीवन धन्य करा.

!! शिवनेरीवर शिवबा जन्मला राजांचा अधिपती व!! !साऱ्याराजांचा अधिपती दैवत छत्रपती न आमचे दैवत छत्रपती!!

जंजिरा किल्ल्याविषयी माहिती? Janjira Fort Information in marathi

शिवनेरी किल्ल्याचा इतिहास

शिवनेरी किल्ला हा 300मीटर उंचीवर वसलेला आहे तुम्हाला हा किल्ला पाहण्यासाठी सात दरवाजे ओलांडावे लागते मग पहा शिवनेरी किल्ल्याची तटबंदी व सुरक्षा त्यावेळी ची किती चांगली होती.

शिवनेरी किल्ल्याचे विशेष आकर्षण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक व राजमाता जिजाऊ यांची स्मारक.

शिवनेरी किल्ल्यावर जाण्याचा मार्ग

Shivneri Fort पुणे शहर हे प्रमुख स्थान आहे पुणे शहरापासून 95 किलोमीटर इतका अंतरावर शिवनेरी किल्ला आहे भारतातील मुंबई हैदराबाद नाशिक कोल्हापूर आणि गोवा या स्थानामधून विविध प्रकारची सेवा खाजगी वाहने व बस सुविधा आहेत जुन्नर शहराच्या मार्गापासून बस प्रवासाने शिवनेरी किल्ल्यावर जाण्यासाठी प्रवास करणे अधिकच उत्तम व आपले खाजगी वाहने देखील शिवनेरी किल्ल्यावर नेऊ शकतात. तिथे पार्किंगची सुविधा आहे तिथे आपले टू व्हीलर किंवा फोर व्हीलर गाडी पार्क करून तुम्ही थेट शिवनेरी किल्ल्यावर जाऊ शकतात व तिथला आनंद घेऊ शकतात.

स्थान जुन्नर पुणे जिल्हा महाराष्ट्र राज्य शासन भारत

शिवनेरी किल्ला हा कोणी बांधला
इसवी सन 17 व्या शतकात यादव यांनी नाणेघाट हा डोंगरावर सुमारे 35 00फूट इतका उंचीवर शिवनेरी किल्ला हा बांधला

शिवनेरी किल्ल्यावर वैशिष्ट्यपूर्ण जागा
छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक व राजमाता जिजाऊ यांचे स्मारक व छत्रपती शिवाजी महाराजांचा पाळणा हे शिवनेरी किल्ल्यावर आहे

छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी कोठे आहे
छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी ही जुन्नर येथे असलेला शिवनेरी किल्ला आहे

छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म
19 फेब्रुवारी 1630 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म हा शिवनेरी किल्ल्यावर झाला

Rushi Bhosle

https://hellosambhajinagar.com/I am a Marathi Blogger, Marathi YouTuber and Owner/Founder of https://thodkyaatnews.com/. 4 Years of Professional Blogging And YouTube experience.

Leave a Comment